स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यातील कालखैरवाडी ग्रामपंचायतच्या कार्यालयातून तब्बल साडेचार वर्षाचे अभिलेख गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंडवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आले आहे.
काळखैरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयातून 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीतील तब्बल साडेचार वर्षाचे अभिलेख गायब झाल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते युवराज पोटे यांच्या माहिती अधिकारातून ही धक्कादायक वास्तव माहिती उघड झाली आहे. संविधानाच्या 73 व्या घटना दुरुस्तीमुळे मासिक सभा व ग्रामसभांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
यामुळे गावचा विकास आराखडा, मासिक सभा, ग्रामसभा तसेच आर्थिक हिशोबांचा या अभिलेखात समावेश होतो त्यामुळे या नोंदवा यांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून मासिक सभा ग्रामसभा व आर्थिक हिशोबाचे नोंदवही असलेले दप्तरच गायब झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून या प्रकरणातील खरा मास्टरमाइंड कोण अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अभिलेख गायब होणे हा गुन्हेगारीचा हेतू असू शकतो अशी शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते युवराज पोटे यांनी वर्तवली आहे.
शासकीय सेवकांच्या ताब्यातील अभिलेख गायब झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद होणे गरजेचे आहे. हा अभिलेख गायब करण्याचा हेतू काय व या मागचा मास्टरमाइंड कोण याची उत्तरे तपासानंतरच मिळणार आहेत यासाठी तालुका पंचायत समितीने पारदर्शक तपास करणे गरजेचे आहे.
























