तरडोलीचे उपसरपंच नवनाथ जगदाळे पुन्हा एकदा सदस्य पदावरून अपात्र
…..
स्टारयुग लाईव्ह: मोरगाव
तरडोली ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी काम करताना आर्थिक हितसंबंध जोपासून काम केल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (१)(ग) नुसार तरडोली चे उपसरपंच व विद्यमान सदस्य नवनाथ जयसिंग जगदाळे यांना तिसऱ्या वेळेला पुन्हा अपात्र करण्यात आले आहे.
नुकताच पुणे विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी हा आदेश दिला आहे.
वास्तविक, तरडोली ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक जानेवारी 2021 मध्ये झाली होती. 25 फेब्रुवारी 2021 रोजी नवनाथ जगदाळे यांची सरपंच पदी बहुमताने निवड झाली.
सरपंच पदी काम करत असताना जगदाळे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शुभम साडी डेपो या दुकानातून 27 जुलै 2021 रोजी कर्मचाऱ्यांना गणवेश खरेदी केले केले व त्याचे बिल ग्रामपंचायत निधीमधून काढले. व चहा पान खर्च ग्रामपंचायत निधी मधुन केला ग्रामपंचायत कामकाजामध्ये स्वतः चे स्वतःच्याकुटुंबाचे आर्थिक हितसंबंध जोपासत काम केल्याप्रकरणी माजी सरपंच व विद्यमान सदस्य विद्या भापकर व सदस्य यांनी बारामती पंचायत समितीकडे तक्रार केली होती.
बारामती पंचायत समितीने वस्तुस्थितीची चौकशी करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ ग नुसार सदस्यपदी राहण्यासाठी अपात्र होत असल्याबाबत चा पाठविलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जगदाळे यांना सरपंच व सदस्य पदासाठी अपात्र केले होते.
मात्र, जगदाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात तत्कालीन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्याकडे अपील दाखल केले. डॉ. रामोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत जगदाळे यांना पात्र ठरवले.
त्यानंतर भापकर यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे याचीका दाखल केली उच्च न्यायालयाने याप्रकरणी फेर चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. फेर चौकशी करून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जगदाळे यांना पुन्हा अपात्र केले.
या आदेशा विरोधात जगदाळे यांनी पुन्हा अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले. मात्र,या प्रकरणातील कागदोपत्री पुरावे कायदेशीर बाजू व युक्ती वाद तपासून जगदाळे यांचे अपील अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी अमान्य केले. व जगदाळे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केल्याचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे जगदाळे हे विद्यमान उपसरपंच व सदस्य दोन्ही पदावरून अपात्र झाले आहेत. भापकर यांच्या बाजूने संपूर्ण कायदेशीर बाजू मांडत युक्तिवाद करत ॲड. हेमंत भांड पाटील यांनी काम पाहिले.
























