मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी नुकतेच बाल आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद बाजार मेळाव्यास विद्यार्थ्यांचं पालकांनी चांगला प्रतिसाद देऊन आर्थिक व्यवहार ज्ञानासह खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.
मोरगाव ता बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानाचे मूल्यमापन करण्यासाठी बाल आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी 2025 रोजी विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व नियोजना खाली या आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे व विद्यालयातील उपस्थित शिक्षकांचा हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य रमेश आप्पासो तावरे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय यशवंत तावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विद्यालयातील या आनंदी बाजार मेळाव्यात एकूण 80 स्टॉल्स बरोबरच तरकारी बाजार भरवण्यात आला होता. यावेळी प्रथमच विक्रेते म्हणून आलेल्या तसेच ग्राहक म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसाडून वाहत होता. या बाजारात किराणामाल, स्टेशनरी साहित्य, वडापाव, भजी पाव, इडली चटणी, मसाले पापड, भेळ, चहा, कॉफी, मसाले दूध, सँडविच, सीट मार्ट, अशा वेगवेगळ्या खाण्याच्या खाऊ गल्ली पदार्थासह वांगी, भोपळा, टमाटे, गवार, मिरची, भेंडी, आदी शेतातील भाजीपालाही विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
विद्यार्थ्यांचा आनंद बाजार मेळावा किंवा खाऊ गल्ली कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्याचे व्यवहार ज्ञान, पैसे कसे कमवायचे आणि कसे खर्च करायचे याचे शालेय स्तरावर प्रत्यक्ष शिक्षक देण्यासाठी आनंदी बाजार मेळावा आयोजित केला जातो. ज्यात विद्यार्थी स्वतःचे खाद्यपदार्थ बनवून विकतात आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्याचा उपयोग शिक्षणासाठी करावा हा यामागील प्रमुख उद्देश असतो. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात थाटलेला या खाऊ गल्ली आनंद बाजारामुळे जणू आठवडे बाजाराच्या स्वरूप प्राप्त झाले होते. नववीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळी काढून या कार्यक्रमाचे शोभा वाढवली होती. विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कोकरे यांच्यासह प्रसिद्धीप्रमुख विभागाच्या सारिका तांबे व सर्व शिक्षक वर्ग यांच्या सुख व्यवस्थापन व मार्गदर्शनाखाली हा अनोखा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
▪️*आनंदी बाजार किंवा खाऊ गल्ली कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि स्वरूप*
▪️ *व्यवहार ज्ञान*➡️ विद्यार्थ्यांना पैसे कमवण्याची आणि खर्च करण्याची प्रक्रिया समजून सांगणे.
▪️ *व्यावसायिक कौशल्य*➡️ स्टॉल लावणे वस्तू विकणे ग्राहकांशी आर्थिक व्यवहारातून बोलणे यातून व्यावसायिक कौशल्य शिकणे.
▪️ *स्वावलंबन*➡️ स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणे.
▪️ *गणित आणि विज्ञान*➡️ गणितातील संकल्पना आणि खाद्यपदार्थ बनवण्याचे विज्ञान अनुभवणे.
▪️ *आदर आणि सहकार्याची भावना*➡️ शिक्षक व पालकांचा आदर व सन्मान राखण्यासह सहकारी वर्ग मित्रांची एकत्र मिळून काम करणे.
▪️ *शैक्षणिक निधी व गरजूला मदत*➡️ यातून मिळालेला पैसा शाळेच्या विकास निधीसाठी, शालेय उपक्रम किंवा गरजूला मदत करण्यासाठी वापरला जातो.
























