Homeशिक्षण-प्रशिक्षणमोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयात संपन्न झाला माजी विद्यार्थी मेळावा. गुरु शिष्याच्या नात्याला तब्बल...

मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयात संपन्न झाला माजी विद्यार्थी मेळावा. गुरु शिष्याच्या नात्याला तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा मिळाला उजाळा.

मयुरेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न.
—————————
गुरु शिष्याच्या नात्याचा ऋणानुबंध जोपासत दिला आठवणींना उजाळा

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज तब्बल 28 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा एक स्नेह मेळावा आज संपन्न झाला. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गुरु शिष्याच्या नात्याचा ऋणानुबंध जोपासला. आठवणींच्या भावनांना हात घालत माजी विद्यार्थ्यांनी हा सोहळा अनोख्या पद्धतीने रंगून आपल्या गुरूंना मानवंदना दिली.

रयत शिक्षण संस्थेचे श्री मयुरेश्वर माध्यमिक व विद्यालयात सन 1996- 97 च्या एस.एस.सी वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी आज एकत्र आले. यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वप्रथम विद्यालयातील एका वर्गात सर्वजण एकत्र जमले. नियोजित कार्यक्रमाची सविस्तर माहिती सांगण्यात आली. गेली एक महिना या कार्यक्रमाच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू होती.

नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने विविध ठिकाणी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले या सर्व मित्रांची आज या निमित्ताने भेट झाली. तब्बल 28 वर्षानंतर हे सर्वजण शाळेच्या आवारात एकत्र जमले होते. कार्यक्रमासाठी खास तत्कालीन सर्व शिक्षकांना विशेष निमंत्रण देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. येथील संपूर्ण कार्यक्रमाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शालेय जीवन व सध्याच्या वास्तवाबद्दल अनुभव कथन केले.

मोरगाव येथील संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी या बॅचचे सर्वच माजी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरगाव तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तावरे सह दादा माडकर व नवनाथ तावरे सचिन यादव यांच्या ग्रुपच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मयुरेश्वर विद्यालयात दोन दिवशीय क्रीडा महोत्सव संपन्न

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव मोरगाव ता बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच दोन दिवसीय...

मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्टारयुग लाईव्ह : मोरगाव बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री...

Realme P4x 5G पुनरावलोकन: परफॉर्मन्स चॅम्प पण तडजोडीसह

परवडणाऱ्या जागेत मोठा बाजार हिस्सा मिळवण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेला मदत करण्यासाठी, Realme ने Realme P4x 5G लॉन्च केला आहे, जो त्याच्या डिव्हाइस पोर्टफोलिओमध्ये Realme P4...

मोरगावच्या “सक्षमने” देश पातळीवरही रोवला यशाचा झेंडा. शिक्षक व पालकांच्या प्रेरणेने अकॅडमी शिवाय तो...

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव येथील मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सक्षम सचिन यादव याने 69...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

error: Content is protected !!