
अष्टविनायकातील ‘मोरगाव’ येथे एका खाजगी गाडीतून गावठी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती आज सुपे पोलिसांना मिळाली. यानुसार धडक कारवाई करत मुद्देमाल व चार चाकी वाहन ताब्यात घेतले आहे. या कामगिरीच आज सर्वत्र कौतुक करण्यात आल. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलीय.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सह उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज कुमार नवसारे पोलीस उपनिरीक्षक जिग्नेश कोळी जयवंत ताकवणे यांच्यासह सुपा पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणी संशयित वाहनाची तपासणी केली असता यामध्ये 35 लिटर क्षमतेचे 13 प्लास्टिकचे कॅन गावठी दारू भरलेले आढळून आले. यामध्ये ४५५ लिटर दारू साठा आढळून आला. तसेच चार चाकी वाहन एम एच ४२ एक. क्यु २०१० हा टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.























