Homeमहत्त्वाचेकोरोना काळातील 23 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्याचे शासनाचे आदेश

कोरोना काळातील 23 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्याचे शासनाचे आदेश

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव ( राहुल तावरे )

कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या गाव पातळीवरील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. या आदेशाचे पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख राहुल तावरे यांनी दिली.

सन 2019 साली कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने संपूर्ण देशात धुमाकूळ घालून संपूर्ण वातावरण हा धरून सोडले होते. या काळात संपूर्ण देशातील जनजीवन ठप्प होऊन मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागले होते. या काळात आरोग्य विभागाच्या मदतीला अनेक छोट्या-मोठ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून या संकटाचा सामना केला होता. यामध्ये आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी तलाठी,ग्रामसेवक, कोतवाल, आशासेविका, शिक्षक यांच्याबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ही मोलाची कामगिरी बजावली होती.

याच महामारी असलेल्या कोरोना रोगाच्या काळात स्वच्छता, आरोग्य तपासणी, लसीकरण मोहीम, नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा, औषध फवारणी, आधी महत्त्वपूर्ण कामे स्वतःच्या जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कार्याची शासनाकडून नुकतीच दखल घेण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षानंतर शासनाकडून गाव पातळीवरील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामनिधी अथवा पंधराव्या वित्त आयोगातून प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. या आदेशामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या आदेशाचे स्वागत केले आहे.

शासन परिपत्रकानुसार दरमा 1000 रुपये प्रमाणे 23 महिन्यांचे एकूण प्रत्येक कर्मचाऱ्यास 23 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश 30 सप्टेंबर 2025 रोजी बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किशोर माने यांनी परिपत्रकद्वारे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना काढले आहेत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेऊन तत्काळ आदेश काढल्याने कर्मचाऱ्यांच्या समाधानाचं व आनंदाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मयुरेश्वर विद्यालयात स्काऊट गाईडचे एक दिवसीय हिवाळी शिबिर संपन्न.

मयुरेश्वर विद्यालयात स्काऊट गाईडचे एक दिवसीय हिवाळी शिबिर संपन्न. स्टारयुग लाईव्ह : मोरगाव रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव ता. बारामती येथील श्री मयुरेश्वर विद्यालयात ...

मोरगाव येथे फास्टॅक प्रमाणपत्राचे व्यवसायिकांना वितरण

मोरगाव येथे फॉस्टॅक प्रमाणपत्राचे व्यवसायिकांना वितरण प्रतिनिधी ( पुणे ) :- केंद्र सरकारने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत सर्व व्यवसायिकांनी फॉस्टॅक ट्रेनिंग घेणे बंधनकारक आहे,मोरगाव येथे...

मयुरेश्वर विद्यालयात दोन दिवशीय क्रीडा महोत्सव संपन्न

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव मोरगाव ता बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच दोन दिवसीय...

मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्टारयुग लाईव्ह : मोरगाव बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री...

Realme P4x 5G पुनरावलोकन: परफॉर्मन्स चॅम्प पण तडजोडीसह

परवडणाऱ्या जागेत मोठा बाजार हिस्सा मिळवण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेला मदत करण्यासाठी, Realme ने Realme P4x 5G लॉन्च केला आहे, जो त्याच्या डिव्हाइस पोर्टफोलिओमध्ये Realme P4...

error: Content is protected !!