स्टारयुग लाईव : मोरगाव
मोरगाव ता. बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांची संयुक्त जयंती साजरी करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयाने आगळावेगळा कार्यक्रम राबवला.
यावेळी हडपसर येथील साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय शितोळे व शेटफळगडे येथील नागेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिलीप जगदाळे, मयुरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे, तुषार माथने, विजय हाडके नजमा शेख या शिक्षकांनी प्रतिमांचे पूजन केले. यावेळी दहावी अ मधील विद्यार्थिनी इंन्शा शेख हिने उपस्थित त्यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले.
तसेच विद्यालयात 15 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हात धुवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिक्षिका आम्रपाली घडवे यांनी इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शिक्षिका पुनम माने यांनी कवितेद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे पर्यवेक्षिका नंदा नाझीरकर, ज्येष्ठ शिक्षकाविद्या जगताप सह शिक्षिका विद्या खैरे नंदा मोहिते सहशिक्षक लालासाहेब आडके प्रवीण आटोळे अमित आवाळे ज्ञानेश्वर राऊत रमेश शेवते अमोल बोडरे इत्यादी शिक्षकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती विद्यालयाच्या प्रसिद्ध प्रमुख सारिका तांबे यांनी दिली.
























