तरडोली जवळ विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
—————-
स्टारयुग लाईव्ह :मोरगाव : मनोहर तावरे
तरडोली ता बारामती येथील तुकाई नगर वस्तीत आज सकाळी १० वा. दरम्यान घरगुती पाण्याची मोटर जोडत असताना विजेचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झालाय. या घटनेत तात्यासो संपत मासाळ ( वय 33 वर्ष ) रा. तरडोली हे मयत झाले आहेत.
याबाबत मोरगाव पोलीस मदत केंद्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान तरडोली गावचे हद्दीत ही घटना घडली.पवारवाडी ते लोणी भापकर कडे जाणाऱ्या मार्गावर तुकाई नगर वस्तीत शेतातील घराजवळ बोरवेलची मोटर जोडत असताना हा अपघात घडला. या घटनेत मेंढपाळ व्यवसाय करणारा युवक तात्यासो संपत मासाळ हे त्याचे वडील संपत खंडू मासाळ दोन जण पिण्याच्या पाण्याची बोरवेलला असलेली मोटर सुरू करीत होते. यावेळी ही दुर्घटना घडली.
येथील बोरवेल च्या ठिकाणी असलेल्या वायरचा जोड देत असताना हातातील पकडला करंट लागून हा अपघात घडला. यावेळी येथे उपस्थित असलेल्या बाप लेका पैकी तरुण मुलगा मयत झाला मात्र वडील तात्यासो संपत मासाळ बचावले आहेत. सुपा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
























