स्टारयुग लाईव्ह :- मोरगाव
बारामती तालुक्यातील मासाळवाडी या ठिकाणी मल्हारी भाऊ मासाळ यांच्या दोन बैलांना विद्युत प्रवाह (इलेक्ट्रिक शॉक) लागून ते जागीच ठार झाली आहेत. याच बैलाच्या जीवावर असणाऱ्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी त्याने केली आहे.
मासाळवाडी या ठिकाणी दुपारी बाराच्या दरम्यान मल्हारी मासाळ (वय ७५) हे आपल्या बैलगाडीसह कामानिमित्त शेतात निघाले होते. परंतु खांबावरील तार आधीच तुटून पडल्याने दोन बैलांना करंट लागून दोन्ही बैल जागीच मृत्युमुखी पडली परंतु सुदैवाने शेतकऱ्याला कुठलीही इजा पोहोचली नाही.
यावेळी महावितरणचे शाखा अभियंता सागर शेलार यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष भारती यांनी त्याचे शव विच्छेदन केले. ग्राम महसूल अधिकारी विकास बारवकर, पोलीस पाटील सुभाष ठोंबरे तसेच मासळवाडी गावातील महिला व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शेतकऱ्यांना दोनच बैल होते व तेही मोठे असल्याने अंदाजे दोन लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
























