स्टारयुग लाईव्ह :- मोरगाव
बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. या जयंती सोहळ्यानिमित्त विद्यालयात जयत तयारी सह अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मोरगाव ता बारामती येथील मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मोरगावचे माजी सरपंच निलेश केदारी . स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पोपटराव तावरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे,पर्यवेक्षिका नंदा नाझीरकर व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
लेझीम पथक झांज पथक टिपरी नृत्य व कलश नृत्य लेझीम नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून अण्णांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हे सांस्कृतिक कार्यक्रम. ग्रामपंचायत व मोरगावच्या मेन चौक या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. विविध वेशभूषा मध्ये विद्यार्थी तयार झाले त्यामध्ये कर्मवीर अण्णा लक्ष्मीबाई पाटील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज.. जिजाऊ. राणी लक्ष्मीबाई.. बाबासाहेब आंबेडकर. अशा वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
वेशभूषा चे नियोजन श्रीमती दुर्गा वाघमारे व विद्या खैरे यांनी केले. प्रवीण आटोळे यांनी कर्मवीर अण्णांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना चौकात करून दिला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सारिका तांबे, नजमा पठाण,सविता खराटे मीनाक्षी वाघमारे आम्रपाली गडवे . पुनम माने.विद्या जगताप. नंदा मोहिते पूजा रणदिवे व ज्ञानेश्वर राऊत. इतर सर्व शिक्षक वृंद यांनी केले.
मिरवणूक झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन शाळेच्या मैदानामध्ये देण्यात आले.. याचे नियोजन अमोल बोडरे, लालासाहेब आडके, अमित आव्हाळे व सर्व शिपाई वर्ग यांनी केले. प्रभात फेरीचे नियोजन तुषार माथने श्री विजय हाडके श्री रमेश शेळके सर यांनी केले.. श्री कुदळे सर व सर्व ज्युनिअर स्टाफ यांनी केले.
























