स्टारयुग लाईव : मोरगाव
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील भागातील जोगवडी अंतर्गत मुकदम मळा येथील विद्युत रोहित्राची वीज वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रोहित्राची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जोगवडी परिसरातील मुकादम मळा येथील एक विद्युत रोहित्र गेल्या अनेक दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेवारस स्थितीत पडून आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे येथील फ्युचर पेट्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्या आहेत. येथील रोहित्रावर असलेला उच्च दाब कमी करावा, विद्युत वाहक्तारांसाठी नवीन फ्युज वापरावेत, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी झाकण बसवावे, अशी येथील शेतकरी व ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी आहे.
मुकादम मळा येथील विद्युत रोहित्रावर शेती व घरगुती असे दोन्ही वीज जोड असल्याने या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त दाब येत आहे. त्यामुळे या परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी 100 केवी क्षमता असलेले नवीन विद्युत रोहित्र मंजूर झाले असून, ते कामे धुळखात पडल्याने शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
येथील फ्युज पेटी शेतकऱ्यांसाठी जणू मृत्यूचा सापळा बनत असल्याने या ठिकाणी शेतकरी फिरकत नसून त्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अनेकदा वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर विद्युत मोटारींच्या चोरीचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती येथील शेतकरी सुनील राजे भोसले यांनी दिली.
मुकादम मळा येथील विद्युत रोहित्राची वीज वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रचंड दुरावस्था झाली असून केवळ अपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वर्गणी करून येतील कामकाज सुरू ठेवले आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने दखल घेऊन या ठिकाणी दुरुस्ती करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने जनवाक्रोश मोर्चा काढला जाईल असे संतप्त शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.
























