मयुरेश्वर विद्यालयात स्काऊट गाईडचे एक दिवसीय हिवाळी शिबिर संपन्न.
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव ता. बारामती येथील श्री मयुरेश्वर विद्यालयात स्काऊट गाईड अंतर्गत एकदिवशी हिवाळी शिबिर संपन्न झाले. विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पाक कलेचा मनमुराद आनंद लुटला.
विद्यालयात दिनांक 26 डिसेंबर 25 रोजी स्काऊट गाईड अंतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागाने एक दिवसीय हिवाळी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यामध्ये सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी त्याच्या निवाऱ्यासाठी तंबू चे नियोजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या निसर्गाच्या सानिध्यामध्ये इयत्ता नववी ब च्या गाईडच्या मुलींनी व मुलांनी सांबर भात चुलीवर बनवला. तर इयत्ता दहावीच्या मुलीनी चहा व पोहे बनविले. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली.सर्वांनी पदार्थांचा आस्वाद घेतला. या सर्व उपक्रमातून सर्व प्रतिष्ठा आणि सांघिक भावना याचे महत्त्व विशद केले गेले. शेवटी शेकोटी गीत घेऊन स्वच्छतेची शपथ देखील घेण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट गाईड प्रमुख सारिका तांबे सहाय्यक नजमा पठाण मीनाक्षी वाघमारे दुर्गा वाघमारे. स्काऊट चे प्रमुख. प्रवीण आटोळे मंदार दुबळे तुषार माथने यांनी केले.
या कार्यक्रमासाठी. पुढारी वर्तमानपत्राचे पत्रकार अशोक वेदपाठक उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कोकरे, पर्यवेक्षिका नंदा नाझीरकर, ज्येष्ठ शिक्षक विजय हाडके, सर्व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थित हा कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला. या एकदिवसीय हिवाळी शिबिराचा विद्यार्थ्यांनी मनमुरात आनंद उपभोगला.
























