Homeमहत्त्वाचेचोपडज ग्रामपंचायतीची कानाडवाडी येथील ग्रामसभा मोठ्या उत्साहात पडली पार, झाडाखालील ग्रामसभेत जनतेचा...

चोपडज ग्रामपंचायतीची कानाडवाडी येथील ग्रामसभा मोठ्या उत्साहात पडली पार, झाडाखालील ग्रामसभेत जनतेचा मोठा सहभाग.

कानाडवाडी येथे चोपडज ग्रामसभा मोठ्या उत्साहात, जनतेचा मोठा सहभाग

स्टारयुग लाईव्ह :- लोणी भापकर

बारामती तालुक्यातील चोपडज ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या कानाडवाडी भागात शुक्रवार, दि. ३० मे रोजी पार पडलेली ग्रामसभा उत्साही वातावरणात संपन्न झाली.
ही ग्रामसभा चोपडजच्या सरपंच मनीषा संदीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रामस्थांचा मोठा सहभाग आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर झालेली सखोल चर्चा यामुळे ग्रामसभा विशेष ठरली.
ग्रामसभेतील महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा झालेल्या प्रमुख बाबी :

1. खोरी रस्ता ते तामजाई रस्ता मुरमीकरण – या भागातील मुख्य संपर्क रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रस्ता मुरमीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यास ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा मिळाला.
2. जलजीवन मिशनमधील गैरकारभार – पाणीपुरवठा योजनेत झालेल्या विलंब व निकृष्ट कामगिरीमुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत ठराव मांडण्यात आला.
3. भूमिहीन नागरिकांसाठी जागेची मागणी – कानाडवाडीतील भूमिहीन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी स्वतःहून अर्ज सादर करून राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी झाली.
4. आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव– स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात म्हणून आठवडे बाजार सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
5. गैरहजर कर्मचाऱ्यांविरुद्ध ठोस पावले– ग्रामपंचायत व संबंधित विभागातील नियमित अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
6. बेकायदेशीर नळकनेक्शनवर कार्यवाही– गावात सुरू असलेल्या अनधिकृत नळ जोडण्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
7. बिरोबानगर येथील पाइपलाइन चेंबर– पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमध्ये अडथळा निर्माण होत असल्यामुळे चेंबर दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
8. स्वतंत्र कानाडवाडी ग्रामपंचायत स्थापनेचा प्रस्ताव – गावाची वाढती लोकसंख्या व प्रशासकीय गरज लक्षात घेता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेबाबतचा ठराव मांडण्यात आला.
9. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप– जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व स्टेशनरी वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, असा निर्णय झाला.
10. घरकुल सर्व्हेचा आढावा– प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी नवीन सर्व्हे घेण्यात यावा, असा निर्णय झाला.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग व प्रशासकीय पाठबळ
या ग्रामसभेला कानाडवाडीतील पुरुष, महिला, युवक-युवतींसह ज्येष्ठ नागरिक, बचत गटाच्या महिलांनाही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ग्रामपंचायत सदस्या जयश्री गाडेकर, ग्रामसेविका दीपाली लडकत, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आणि माजी पदाधिकारी यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
ग्रामस्थांनी अनेक वर्षांनंतर आपल्या गावातच ग्रामसभा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. चोपडज ते कानाडवाडी हे सुमारे ५-६ कि.मी. अंतर असल्याने अनेकांना मुख्य ठिकाणी होणाऱ्या ग्रामसभेला जाता येत नसे. त्यामुळे सरपंच मनीषा भोसले यांनी पुढाकार घेऊन ग्रामसभा स्थानिक स्तरावर आयोजित केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.

सकारात्मक, खेळीमेळीचे वातावरण
ही ग्रामसभा अत्यंत सकारात्मक, लोकसहभागाने भरलेली व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विविध विषयांवर उघडपणे मते मांडली गेली. काही ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.
सरपंच भोसले यांनी सर्व प्रश्नांची नोंद घेतली असून पुढील ग्रामपंचायत बैठकीत ठराव राबवून योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मयुरेश्वर विद्यालयात स्काऊट गाईडचे एक दिवसीय हिवाळी शिबिर संपन्न.

मयुरेश्वर विद्यालयात स्काऊट गाईडचे एक दिवसीय हिवाळी शिबिर संपन्न. स्टारयुग लाईव्ह : मोरगाव रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव ता. बारामती येथील श्री मयुरेश्वर विद्यालयात ...

मोरगाव येथे फास्टॅक प्रमाणपत्राचे व्यवसायिकांना वितरण

मोरगाव येथे फॉस्टॅक प्रमाणपत्राचे व्यवसायिकांना वितरण प्रतिनिधी ( पुणे ) :- केंद्र सरकारने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत सर्व व्यवसायिकांनी फॉस्टॅक ट्रेनिंग घेणे बंधनकारक आहे,मोरगाव येथे...

मयुरेश्वर विद्यालयात दोन दिवशीय क्रीडा महोत्सव संपन्न

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव मोरगाव ता बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच दोन दिवसीय...

मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मयुरेश्वर विद्यालयातील आनंदी बाजार व खाऊ गल्ली कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्टारयुग लाईव्ह : मोरगाव बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री...

Realme P4x 5G पुनरावलोकन: परफॉर्मन्स चॅम्प पण तडजोडीसह

परवडणाऱ्या जागेत मोठा बाजार हिस्सा मिळवण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेला मदत करण्यासाठी, Realme ने Realme P4x 5G लॉन्च केला आहे, जो त्याच्या डिव्हाइस पोर्टफोलिओमध्ये Realme P4...

error: Content is protected !!