स्टारयुग लाइव्ह : मोरगाव
रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव ता बारामती येथील मयुरेश्वर विद्यालयात आज 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडून सामूहिक वंदे मातरम म्हणून घेण्यात आले. या आगळ्यावेगळ्या विशेष कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षकांचं विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
या दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थी दिन देखील साजरा करण्यात आला. विद्यालयाचे पर्यवेक्षिका नंदा नाझीरकर, ज्येष्ठ शिक्षिका आम्रपाली गडवे, ज्येष्ठ शिक्षक विजय हाडके, तुषार माथने, अमोल जगताप, पुनम माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख व इतर सर्व शिक्षक वर्ग यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले.
इयत्ता सातवी मधील स्वराली तावरे हिने आजच्या विद्यार्थी दिनाचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. अशा तऱ्हेने विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या संपन्न झाल्याची माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख सारिका तांबे यांनी दिली.
























