मोरगाव येथे फॉस्टॅक प्रमाणपत्राचे व्यवसायिकांना वितरण
प्रतिनिधी ( पुणे ) :- केंद्र सरकारने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत सर्व व्यवसायिकांनी फॉस्टॅक ट्रेनिंग घेणे बंधनकारक आहे,मोरगाव येथे ,ग्रामविकास अधिकारी , श्री दीपक बोरावके, निलेश केदारी , श्री गणेश तावरे,अक्षय तावरे यांच्या हस्ते फॉस्टॅक प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थ विक्रेते उत्पादक डीलर, डिस्ट्रिब्युटर , रिटेलर्स, तसेच अन्न प्रक्रिया व्यवसायिक यांनी ट्रेनिंग घेणे तसेच प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यासाठी हे ट्रेनिंग व्यवसायिकांनी घेणे बंधनकारक आहे,यामुळे व्यवसायाचा दर्जा आणी गुणवत्ता वाडणार आहे ,
हे नियोजन पुणे डिस्ट्रिक को ऑर्डिनेटर श्री जितेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, यावेळी इम्तियाज पठाण,नवनाथ नेवसे ,किसन डुबे,प्रकाश चौधरी,दामोदर पालवे,सुरज तेली सर व इतर उपस्थित होते .
























